अवैधरित्या हत्यारे बनविणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’, चौघांना अटक तर 10 घातक शस्त्र जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्ली क्राईम ब्रांचने ने एका अवैध्य पद्धतीने हत्यारे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणाच्या मेवात येथून आरोपीना अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 10 शस्त्रे आणि शस्त्रे बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.

मागच्या आठवड्यात गुरुग्राम येथील क्राईम ब्रांचने राजस्थानमधील भरतपूर येथे एका अवैध्य पद्धतीने हत्यारे बनवणाऱ्या फॅक्ट्रीवर छापा टाकून एकाला अटक केली होती. अटक केलेल्या आरोपीचे नाव उमर असून त्यानं आतापर्यंत सातशे हत्यारे बनवल्याचे माहिती समोर आली आहे. छाप्यात पोलिसांनी काही हत्यारेसुद्धा जप्त केली आहेत.

उमर पाच हजारांच्या एक कट्टा आणि पंधरा हजारांना एक रिव्हॉल्व्हर विकत होता. त्याने अनेकांनी बंदुका विकल्या त्याच्यासकट अजून हत्यारे बनवणार्यांबद्दलचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत.

You might also like