सातारा पोलिसांचे बनावट ID बाळगणाऱ्या विरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या तोतया पोलिसावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कल्पेश वसंतराव भालेराव (35, रा. कमान, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रवींद्र वसंतराव आघाव यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तळेगावकडून कात्रजच्या दिशेने जाणा-या कारला (एमएच 14 / जीएच 4795) अडवले. कारच्या खिडक्यांना काळ्या फिल्म बसवल्या होत्या. देहूरोड पोलीस कारचालकावर कारवाई करत असताना कल्पेश याने तो पोलीस दलात असल्याचे सांगत सातारा पोलीस दलाचे ओळखपत्र दाखवले.

मात्र, हे ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like