प्रेयसीचं लग्न झाल्यावर ‘लव्हर’नं केलं ‘हे’ काम, 10 दिवसात पतीनं काढलं घराबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रियसीच लग्न झाल्यानंतरही प्रियकराने तिचा एक अश्लील व्हिडीओ तिच्या पतीला पाठवून दिल्याने एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ पाहून दहा दिवसांपूर्वीच घरी आणलेल्या नव्या नवरीला नवरदेवाने घराबाहेर काढले. दरम्यान, नखासा गावातील या तरुणाच्या विरोधात नव विवाहितेने अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.

या गुन्ह्यासंदर्भात बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक आलोक जयस्वाल म्हणले की, आरोपी तरूण संभलच्या नखासामध्ये राहतो. आरोपी शरीफचं पीडितेच्या घरी येणं-जाणं होतं. प्रसंगावधान साधत त्याने पीडितेसोबत संपर्क बनवून अश्लील व्हिडीओ तयार केला. दरम्यान दहा दिवसापूर्वी प्रेयससीचं लग्न झालं. त्यानंतर आरोपी तरूणाने पीडितेला जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. तसेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देत होता. संबंध ठेवण्यास जेव्हा पीडितेने नकार दिला तेव्हा त्याने तिचा अश्लील व्हिडीओ तिच्या पतीच्या मोबाइलवर पाठवला. व्हिडीओ पाहून पतीने तिला घरातून काढल्याचे सांगत तक्रार दाखल केल्यानंतर त्या तरुणाला तत्काळ अटक करण्यात आली आहे.