Crime News | संतापजनक ! शिक्षकानं विद्यार्थिनीला लावलं नादाला, कॉलेजला गेल्यानंतर देखील सुरू होतं ‘नाटक’; गावकर्‍यांना समजलं अन्…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थिनींना शाळेत बोलावून अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार (Atrocities on minor girls) करण्याचा संतापजनक प्रकार यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गावकऱ्यांनी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला उघडा करुन चोप (teacher beaten) दिला. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना यवतमाळ (Yavatmal Crime) तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी (दि.7) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असूनहा संताप व्यक्त केला जात आहे. या शिक्षकवार ग्रामीण पोलिसांनी (Rural police) गुन्हा (FIR) दाखल करुन बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

अरुण राठोड Arun Rathod (वय-55 रा. जावळा) असे विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. तो बेलोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School, Belora) मागील चार वर्षापासून कार्यरत आहे. अरुण राठोड याने एका अल्पवयीन मुलीला नादी लावले होते. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरु होता. ती मुलगी महाविद्यालयात गेल्यानंतरही राठोड तिला क्लासच्या बहाण्याने शाळेत बोलत होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती.

गावकऱ्यांची शाळेला अचानक भेट
अल्पवयीन विद्यार्थिनीला तुला चांगलं शिकवतो, तुला चांगले गुण मिळतील असं आमिष दाखवून अत्याचार करत होता. शाळा बंद असतानाही तो अतिरिक्त वर्ग (Extra class) घेत होता. रविवारी देखील हा शिक्षक शाळेत दिसत असल्याने वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरु असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. शनिवारी गावकरी अचानक शाळेत गेले. त्यावेळी शिक्षकाचे गैरकृत्य समोर दिसले.

 

शिक्षकाला उघडा करुन चोप

गावकऱ्यांना संताप अनावर झाल्याने ग्रामस्थांनी त्याला उघडा करुन चोप दिला तसेच त्याची दुचाकी पेटवून दिली. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना (Yavatmal Rural Police) दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशोर जनगरे (Kishor Jangare), पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार (PSI Sachin Pawar) पथकासह बेलोरा येथे पोचले. मात्र संतापलेले गावकरी आरोपी शिक्षकला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन शिक्षकाची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली.

विद्यार्थिनीला व अरुण राठोड याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली.
पीडित मुलीच्या आई-वडिलांशी त्यांनी चर्चा केली.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन कलम 376, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (Prevention of child sexual abuse Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Crime News | Annoying! The teacher made the student laugh, even after going to college, the ‘drama’ starts; The villagers understood and …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन केला गर्भपात; पिडीतेने विषारी गोळ्या खाल्याने उघडकीस आला प्रकार

Gold Scheme | उद्यापासून पाच दिवस स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

Pune Crime | गाडी जोरात चालवल्याच्या कारणावरून महिलेसह भावाला मारहाण; पाच जणांवर FIR