Pune Crime | 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन केला गर्भपात; पिडीतेने विषारी गोळ्या खाल्याने उघडकीस आला प्रकार

पुणे / पिंपरी : Pune Crime | इंस्ट्राग्रामवरुन (Instagram) झालेल्या मैत्रीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करुन ती गर्भवती राहिल्यावर तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. मुलीने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) उमेश गजानन सोनवणे Umesh Gajanan Sonawane (वय 21, रा. शिवाजीनगर, अंमळनेर, जि. धुळे) याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दीड वर्षापासून सुरु होता. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे (Pune Crime) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी व आरोपी उमेश सोनवणे यांची इंन्स्ट्राग्रामवरुन ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व तिला फुस लावून आतापर्यंत अनेक वेळा त्याच्याकडे अंमळनेरला पळवून नेले. 27 जुलै 2021 रोजी ती घरातून निघून जाऊन आरोपींच्या घरी अंमळनेरला गेली. तिथे तिने विषारी औषधांच्या गोळ्या खाल्या. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. तेथून तिला पुण्यातील महिला सेवाग्राममध्ये ठेवण्यात आले. तेथील अधिक्षकांनी तिची चौकशी केली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजल्यावर त्यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांना पत्र दिले. ही मुलगी व उमेश सोनवणे यांच्यात शरीरसंबंध होत होते. त्यातून ती दोन महिन्यांपूर्वी गर्भवती झाली होती. उमेश याने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला, असे तिने सांगितले. महिला बाल कल्याणने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. ही बाब मुलीच्या आईला समजली. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Scheme | उद्यापासून पाच दिवस स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

Pune Crime | गाडी जोरात चालवल्याच्या कारणावरून महिलेसह भावाला मारहाण; पाच जणांवर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | rape on girl, 17-year-old girl aborted; The victim was exposed to poisonous pills

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update