Crime News | धक्कादायक ! 9 महिन्यांपासून 14 वर्षीय लेकीवर वारंवार बलात्कार; नराधम जन्मदात्या वडिलाला अटक

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – Crime News | पश्चिम बंगालमधील (West Bengal) एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली (Crime News) आहे. तेथील एका चौदा वर्षीय लेकीवर जन्मदात्या वडिलांने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम वडिल स्वत:च्या मुलीवर मागील नऊ महिन्यापासून अत्याचार करत असल्याचं समोर आलं आहे.

याबाबत माहिती अशी, पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्यांचा 19 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने ती बेड रेस्टवर होती. मार्च महिन्यापासून तिचा नवरा आपल्याच मुलीवर बलात्कार करत होता. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असतानाही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने तिच्या सासू-सासरे आणि वहिनीवर केलाय. मुलीने वडिलांच्या कृत्याबद्दल घरी सांगितले तेव्हा तिलाच उलट धमकी दिली गेली की पोलिसांकडे तक्रार (Crime News) केली किंवा बाहेर कुठे वाच्यता केली तर अवघड होईल.

दरम्यान, पिडित मुलगी दुर्गापूजेच्या वेळी आजीच्या घरी गेली असता आजीला जरासा संशय आला. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर चिमुरडीच्या आईने आणि आजीने नराधमाविरोधात नारायणपूर पोलीस ठाण्यात (Narayanpur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्यान्वये (Pokso Act) गुन्हा दाखल करून आरोपी असीम कुमार साहा (Asim Kumar Saha) याला पोलिसांनी बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत.

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | father was raping minor daughter for 9 months arrested after grandmother complaint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update