Crime News | पतीने हुंड्यासाठी लावला तगादा; पत्नीने गळफास घेवून संपवलं जीवन, पोलिस पतीला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ होत असल्याने रामेश्वर कॉलनीत एका 23 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केली आहे. विवाहितेस हुंड्यातील उर्वरित तीन लाख रूपये आणावे अशी मागणी पोलीस पतीकडून सातत्याने होत असल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना गुरूवारी (9 सप्टेंबर) घडली आहे. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस पतीला (Jalgaon Crime News) पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रविण श्यामराव पाटील (Pravin Shyamrao Patil) (रा. मेहरूण)
यांची लहान मुलगी कोमल हिचा विवाह 13 फेब्रुवारी 2016 रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे (Chetan Arvind Dhakne) यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला.
चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस (Police) कर्मचारी
म्हणून कार्यरत आहे. विवाहावेळी हुंडा म्हणून 20 लाख रूपये देण्याचे ठरले होते.
मात्र, विवाह थाटात झाल्याने प्रविण पाटील यांनी 7 लाख रूपये दिले होते.
बाकी 13 लाख रूपयांपैकी 10 लाख रूपये 4 महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी दिले होते.
हुंड्यातील 3 लाख रूपये देणे बाकी होते.

 

या दरम्यान, बाकी हुंड्यातील तीन लाख रूपये आणावे यासाठी पती चेतन ढाकणे याने
विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करत होता.
यानंतर त्याने हुंड्याची रक्कम तातडीने आणावी यासाठी मंदाबाई अरविंद ढाकणे (सासू),
प्रतिभा ज्ञानेश्वर घुगे (नणंद) आणि ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे (जावई) यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली होती.
या घरच्या त्रासाने कोमलने ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
यानंतर चेतन याने कोमलला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आणि तिच्या कुटूबियांना ही माहिती सांगितली.

दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच विवाहिता कोमलचे आई -वडिलांनी
जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
यात सासरच्या जांचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप कोमलचे
वडील प्रविण पाटील यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहे.

 

Web Title : Crime News | Husband begs for dowry; Wife strangled to death, police arrest husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anna Hazare | अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

Bhausaheb Rangari Ganpati | प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांची केली घोषणा, यंदाही ऑनलाईन कार्यक्रम पाहता येणार

Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती