MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्यावरील आरोपांशी सईद खानचा संबंध काय?, जाणून घ्या

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – MP Bhavana Gawali | शिवसेना नेत्या आणि खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्यावर अर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरुन सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केली. काही दिवसांपुर्वी त्यांच्या 9 संस्थावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यानंतर आज (मंगळवारी) भावना गवळी यांचा निकटवर्ती असणारा सईद खानला (Saeed Khan) ईडीने अटक (Arrested) केली आहे. गवळी यांच्या अनेक आर्थिक व्यवहारांशी खान याचा थेट संबंध असल्याचं म्हटले जात आहे. त्यामुळे ED ने पाथरी येथे कारवाई करत खानला अटक केली आहे.

परभणी येथील पाथरी शहरातील वास्तव्यास असणारा सईद खान (Saeed Khan) हा मोठा कंत्राटदार आहे.
तो खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांचे निकटवर्तीय मानला जातो.
कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद खान हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला.
खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केली असल्याचं म्हटलं जात आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ED) तुर्तास भावना गवळी यांच्यावर कोणतेही कारवाई केली नाही.
पंरतु, सईद खान याला अटक केल्यानंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर अर्थिक गैरव्यवहार घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर ED ने गवळी यांच्या संस्थावर छापेमारी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तेव्हा परभणी येथील पाथरीमध्ये ईडीने मोठी कारवाई केली होती. मात्र, वाशिम आणि परभणीमध्ये एकाच दिवशी पडलेल्या धाडींमध्ये कनेक्शन नेमकं काय? यावरुन चर्चा रंगल्या होत्या. पंरतु, आता ते उघड झालं आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

Pune Police Crime Branch | ज्लेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MP Bhavana Gawali | explainer who is saeed khan what is his connection with bhavana gawali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update