Crime News | विवाहाच्या 27 दिवसानंतर पतीचे क्रूर कृत्य; हनिमूनला केलं भलतचं कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | लग्नानंतर अवघ्या 27 दिवसातच हनिमूनला (Honeymoon) गेलेल्या पतीने (Husband) पत्नीची क्रूर पद्धतीने हत्या (Wife Murder) केल्याची घटना माउंट आबू (Mount Abu) येथे उघडकीस आली. पहिल्यांदा पत्नीच्या तोंडात पानं घातली आणि त्यानंतर फांदीने पतीने पत्नीचा गळा आवळला. दरम्यान, पतीने प्रकृती अवस्थेमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची महिती दिली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालामुळे हा प्रकार उघडकीस आला महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध पोलीस ठाण्यात (Police Station) फिर्याद दिली आहे. जॉली कुमार Jolly Kumar (वय 32 ,रा. खतलवाडा, वलसाड-गुजरात Valsad-Gujarat) असे गुन्हा (FIR) दाखल झाल्याचे (Crime News) नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जॉली कुमार याचा वलसाडमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा उद्योग आहे.
त्याचे रुचिका (Ruchika) सोबत नुकतेच लग्न झाले आहे.
10 जानेवारीदरम्यान हे जोडपे हनीमूनसाठी माउंट आबू येथे आले होते.
गुजरात तोरणा भवन (Gujarat Torna Bhavan) येथे हे जोडपे थांबले होते.
त्याच दिवशी रुचिकाला उलट्या होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तत्पूर्वीच तीचा मृत्यू झाला होता. डॉ. नवीन शर्मा (Dr. Naveen Sharma), तनवीर हुसेन (Tanveer Hussain) आणि कुसुम लता अग्रवाल (Kusum Lata Agarwal) यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. (Crime News)

डॉ. नवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिकाचा शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem Report) एक महिन्यानंतर मिळाला आहे.
त्यामध्ये तिचे सर्व अवयव ठीक असल्याचे सांगितले आहे.
मात्र तिचा गळा झाडाच्या फांदीने आवळला आहे.
इतकच नाही तर मूठभर पानं रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.
फांदीने गळा आवळल्यानंतर तिचं तोंड जाड उशीने किंवा इतर कोणत्याही वस्तूने दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.

 

शवविच्छेदन अहवालात रुचिकाच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई (Harish Bhai) यांनी गुरुवारी माउंट आबू पोलीस ठाण्यात (Mount Abu Police Station) रुचिकाचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

हरीश भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिकाचा १३ डिसेंबर २०२१ ला जॉलीसोबत विवाह झाला होता.
त्यानंतर 24 दिवसानंतर हे जोडपे हनिमूनला माऊंट अबू येथे निघाले होते.
अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर 7 जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर 9 जानेवारीला रुचिकाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करत असतानाच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती जॉलीने फोनकरून कुटुंबियांना दिली होती.
मात्र शवविच्छेदन अहवालामुळे सत्य समोर आले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

Web Title :- Crime News | man jolly kumar murder wife ruchika on honeymoon trip to mount abu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा