Crime News | खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच केला महिला रुग्णावर अत्याचाराचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस (Crime News) आली आहे. एका खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच २५ वर्षीय महिला रुग्णावर बलात्कार करण्याचा (Crime News) प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपाऊंडरला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आझमगड येथील एका नर्सिग होममध्ये ६ सप्टेंबरला सर्दी, तापामुळे उपचारासाठी पीडितेला भरती करण्यात आले होते. त्यानंतर रात्री कंपाऊंडरने तिच्या सोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले, तर पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीसोबत कंपाऊंडर रात्री अत्याचार करत होता. मला जाग आल्याचे कळताच कंपाऊंडर तेथून पळाला. दरम्यान पतीने आरडाओरडा सुरु केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांची याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी तिथे येऊन कंपाऊंडरला ताब्यात घेतले.

दरम्यान, आझमगडचे एसपी सुधीर सिंह म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून कंपाऊंडर तेथे कामाला आहे.
पीडितेने कंपाऊंडरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
घटनेवेळी पीडितेचा पतीदेखील त्याच खोलीत झोपला होता त्यामुळे त्याचीदेखील चौकशी केली जाणार आहे. सत्य लवकरच समोर येईल असे त्यांनी सांगितले.

Web Titel :- Crime News | shocking attempted rape female patient compounder hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in india | देशात गेल्या 24 तासात 33 हजार 376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ; जाणुन घ्या आजचे दर

CM Vijay Rupani Resigns | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा