Crime News | 500 रुपयांवर प्रतिदिन 100 रुपये व्याज, खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 2 तरुणांची आत्महत्या

सोनपेठ : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी सावकाराकडून (money laundering) घेतलेल्या 500 रुपयांसाठी प्रतिदिन 100 व्याजासाठी दिला जात असलेल्या त्रासाला वैतागून दोन तरुणांनी आत्महत्या (commit suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोनपेठ शहरात (Sonpeth Crime News) सोमवारी (दि.30) घडली आहे. दोन तरुणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून केल्याचा संशय नातेवाईकांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या हातावर सावकारांची नावे लिहून आत्महत्या केली आहे. दरम्यान या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपी (Crime News) फरार झाले आहेत. एका वृत्तवाहीनीने याबाबत वृत्त दिले आहे.

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

सुनील पारवे (Sunil Parve) व रितेश क्षीरसागर (Riteish Kshirsagar) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणाची नावे आहेत. सुनील आणि रितेश हे दोघे सोनपेठ शहरातील सोनखेड येथील बालेपीर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी बेशुद्धवस्थेत पडले होते. याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मीरा क्षिरसागर यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात (Sonpeth police station) फिर्याद दिली आहे.

रितेश क्षीरसागर हा मिस्त्री काम करीत होता, त्याच्याकडे सध्या कोणतेच काम नव्हते. काम नसल्याने त्याने घेतलेल्या कर्जाचं व्याज 100 रुपये देऊ शकत नव्हता पण खासगी सावकार अजय घुगे, सुनील मुंडे, हनुमंत घुगे आणि ऋषी हे त्याच्याकडे रोज पैशांसाठी तगादा लावत होते. तसेच त्यांनी मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या धमकीला आणि कर्जाचा भार सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे रितेशच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, खासगी सावकारकडून हातउसने पैसे घेतले
होते. त्याचे व्याज देण्याचे ठरले होते. मात्र, सावकाराने दररोज व्याजाचे 100 रुपये देण्यासाठी तगादा लावला.
घटनेच्या दिवशी दुपारी त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ते रस्त्याच्या कडेला बेशुद्धवस्थेत
आढळून आले. खासगी सावकाराने त्यांना विष पाजून त्यांचा खून केला असा आरोप नातेवाईकांनी केला.

हे देखील वाचा

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : crime news | victims money laundering two youths commit suicide due beatings and death threats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update