काय सांगता ! होय, राहत्या इमारतीत वकीलच चालवत होता चक्क जुगाराचा अड्डा, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वकिल इमारतीतील आपल्या राहत्या घरातच जुगाराचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 1 नं. ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अ‍ॅड. ललित जैनसह 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कफ परेड येथील ही घटना आहे. या कारवाईत पोलिसांनी पावणेतीन लाखांची रोकड, प्लास्टिक कॉईन आणि खेळाचे पत्ते जप्त केले आहेत. या कारवाईनं परिसरात खळबळ उडाली आहे.

अ‍ॅड. ललित जैन यानं खोलीतच जुगाराचा अड्डा तयार केला होता. कफ परेड येथील मीनू मायनर इमारतीत हा अड्डा होता. यामध्ये वकिल आणि व्यावसायिकांचा समावेश होता. जैनची इमारत पागडी पद्धतीची होती जी जैनच्या मालकीची होती. मित्रांसोबत तो जुगार खेळत खेळण्यासाठी येत असे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

गुन्हे शाखेला या जुगाराच्या अड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश तावडे, एपीआय अनंत शिंदे, पीएसआय ज्ञानेश्वर जगताप, अंमलदार संतोष लोखंडे, तानाजी मोरे, जितेंद्र शेडगे, नितीन तायडे, शैलेश शिंदे आणि चालक अमोल वऱ्हाडी या तपास पथकानं घटनास्थळी छापा टाकला होता. यात जैनसह 78 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/