निवृत्त ‘सिव्हिल सर्जन’चा बंगला फोडला, तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल लंपास

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त सिव्हिल सर्जन एन जी कलवले यांच्या सिडको एन ३ येथील बंगल्यात चोरट्यांनी डल्ला टाकला आहे. सुमारे ८० तोळ्यांचे दागिने आणि पावणे पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे आणि सहायक आयुक्त साळोखे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त सिव्हिल सर्जन नामदेव कलवले आपल्या पत्नी , मुलगा डॉ समीर , सून आणि बारा वर्षीय नात यांच्यासह सिडको एन ३ मधील बंगला क्रमांक १२ मध्ये राहत होते.

दरम्यान, कलवले कुटुंब शनिवारी फिरायला मुंबईला गेले होते. मात्र, त्यांच्याकडे काम करणारी सखूबाई ही रोज सकाळी येऊन बंगल्याची पाहणी करत असे. काल सकाळीसुद्धा ती येऊन गेली होती, त्यांनतर आज सकाळी पुन्हा बंगल्यात आली असता तिला मुख्य दाराची ग्रील काढलेली दिसली. संशय येताच तिने डॉक्टर कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचारी बंगल्यावर दाखल झाले. तपासादरम्यान, बंगल्यातून ८० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पावणे पाच लाख रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/