सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुन्हेगारास आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आकाश सदाशिव मोहिते (वय 20, रा. शंभर फुटी रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. विश्रामबाग पोलिसांचे एक पथक शांतीबन चौक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आकाश संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हद्दपार आदेशाचा भंग करून तो शहरात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक परीट यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –