क्रौर्याची परिसीमा : इंजीनियरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडावर लटकवला मृतदेह 

रायचूर : वृत्तसंस्था – कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला जिवंत जाळून मारण्यात आले आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी या तरुणीचा मृतदेह झाडावर लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला.या मुलीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट  देखील सापडली आहे. यात ही आत्महत्या असल्याचे भासवण्यात आले.  सखोल तपासानंतर नेमके प्रकरण काय आहे ते लक्षात आले.



रायचूर येथे १६ एप्रिल रोजी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी तरुणी मधूचा जळालेला मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह एका झाडावर लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट  सापडली होती. ज्यात परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचे लिहले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठवला. त्यानंतर पोलीस या प्रकरणात तपास करण्याच्या मागे लागले. पण मधुच्या कुटुंबीयांनी मधुची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.

मधुच्या कुटुंबीयांनी रायचूरचे एसपी किशोर बाबू  यांची भेट घेतली. कुटुंबीयांनी मधुची हत्या करण्यात आली असल्याची तक्रार पोलिसात दिली.या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आले असून त्याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान मधुवंती अत्याचार करून तिला जालन्यात आल्याची चर्चा आहे.

सोशलवर #justiceformadhu

इतक्या क्रूरतेने मधुचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. या घटनेमुळे संतापलेल्या  नेटकऱ्यांनी मधुला न्याय मिळावा याकरिता सोशल मीडियावर मोहीम उभी केली आहे. काही जणांनी घटनास्थळाची भयानक छायाचित्रे पोस्ट केली आहेत. काहीच लोक आरोप करीत आहेत की तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता.

https://twitter.com/nidhimanhas/status/1119171838951583745

 

शुक्रवारी सकाळपर्यंत change.org वर मधुसाठी न्याय मागणाऱ्या याचिकेवर २०,०००पेक्षा अधिक जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या घटनास्थळाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हयरल होत असली तरी पोलिसांनी ती जारी केली नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.