सांगलीत अट्टल गुन्हेगार वर्षासाठी स्थानबद्ध

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

घरफोडी, चोरी, मारामारी, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पवन उर्फ पवन्या धमेंद्र साळुंखे (वय 20, रा. जुना बुधगाव रस्ता) असे त्याचे नाव आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी पोलिसांच्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली.
[amazon_link asins=’B00VRV2MVG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9cfdada-94d0-11e8-91cc-2bf4078c7cb0′]
पवन साळुंखे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी, चोरी, मारामारी, खंडणी, अपहरण यासारखे 17 गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे सांगली शहरचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मंजुरीने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला होता. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.