सराईत गुन्हेगार एमपीडीएखाली १ वर्षाकरता स्थानबद्ध 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – खुनी हल्ला, दंगल, तोडफोड, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला एमपीडीएखाली एक वर्षाकरता पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.

मनोज म्हसुकांत विटकर (२७, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर हा पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगल, तोडफोड, खंडणी, दहशत पसरवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर तीन वर्षे मोक्काखाली येरवडा कारागृहामध्ये रवानगी केली होती.

तेथून सुटल्यानंतर त्याने पिंपरी परिसरात आपल्या गुन्हेगारी कारवायांना पुन्हा सुरुवात केली. यामुळे त्याची परिसरात आणखी दहशत पसरत असल्याने पोलिसांनी त्याला स्थानबध्द करून त्याची रवानगी पुन्हा येरवडा तुरूंगात केली.