आधीच ‘पूर’, त्यात ‘सावित्री’ मधून ‘तिचे’ आगमन, ‘महाड’वासीय ‘भयभीत’ !

महाड : पोलीसनामा ऑनलाईन – महाड शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना सावित्री नदीत असलेल्या मगरीपैकी एक मगर ही पुराच्या पाण्यात शहरातील एका घराच्या छपरावर विसावली आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दादली पुलावरही नदीतील मगर दिसली होती. त्यामुळे नागरी वस्तीत मगर पुराच्या पाण्याने येत असल्याने महाडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाड शहरात चार दिवस झालेल्या पूरस्थितीने शहरातील सुकट गल्लीत पाणीच पाणी साचले होते. या पुराच्या पाण्यात एक मगर एका घराच्या छपरावर येऊन विसावली होती. याबाबतचा व्हिडीओ एकाने काढला आहे. त्यामुळे ही बाब समोर आली आहे. आठवड्या पूर्वीही दादली पुलावर पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमारास मगर विहार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पुराच्या पाण्यातुन मगरी शहरात नागरी वस्तीत आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने येत असल्या तरी मगर हिंस्त्र प्राणी असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामळे महाडकरांच्या मनात मगरीच्या भीतीचे सावट पसरले आहे.

आरोग्यविषयक वृत्त