राज्यातील भाजपची अवस्था म्हणजे पाण्याविना ‘मासा’, बाळासाहेब थोरांताची भाजपवर ‘टीका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे. आज बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष केले. राज्यात भाजपचे सरकार न आल्याने त्यांची स्थिती पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी झाली आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांना प्रत्युत्तरादाखल केली.

तसेच चंद्राकांत पाटलांनी थोरातांवर टीका केली होती की काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर याची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत किंवा दिलासा देऊ शकले नाहीत.

बाळासाहेब थोरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शपथविधीनंतर मंत्र्यांचे खातेवाटप रखडले असताना शनिवारी सकाळी अब्दुल सत्तार यांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्याने महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाली आहे. परंतु, आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घतेली पाहिजे की, महविकासआघाडीचे सरकार हे तीन पक्ष एकत्रित सरकार आहे. या सरकारमध्ये अनेक दिग्गज, अनुभवी नेते असले तरी मंत्रिपद मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार पदांचे वाटप होणे अशक्य आहे. काळाच्या ओघात राजकारणात देखील वेग आला आहे असेही थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यावेळी पालकमंत्री पदावरुन असलेल्या वादासंबंधित म्हणाले की, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी महाविकासआघाडी प्रयत्नशील आहे. माझ्याकडे राज्याची महत्वाची पदे आहेत. मला जरी पालकमंत्री पद मिळाले नसले तरी मी माझ्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून काम करेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/