Cyberchondria | इंटरनेटवर आजारांबाबत शोध घेण्याने वाढून शकते तुमचे आजारपण, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cyberchondria | अनेक लोक नेहमी आपले रोग, लक्षणे आणि समस्यांबाबत इंटरनेटवर सर्च करतात. जेणेकरून बचाव, उपचार इत्यादी बाबत जाणून घेता येईल. परंतु आजारांबाबत इंटरनेटवर शोध घेणे जास्त ’आजारी’ बनवू (Cyberchondria) शकते. हेल्थ एक्सपर्टने याबाबत दिलेली माहिती जाणून घेवूयात…

इंटरनेटवर माहिती शोधणे आजारी कसे बनवू शकते?
हेल्थ एक्सपर्ट म्हणतात की, सध्या लहान-मोठ्या सर्व समस्यांबाबत जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम इंटरनेटची मदत घेतो. सध्या कोरोना महामारी बाबत माहिती मिळवण्यासाठी याचा खुप वापर केला गेला आहे.

सर्व प्रथम आपल्याला सतर्क राहिले पाहिजे की, आपण जी माहिती मिळवत आहोत, ती प्रामाणिक आहे किंवा नाही. कारण, इंटरनेटवर खुप कच्ची आणि अर्धवट माहिती फिरत आहे. जी अवलंबल्यानंतर आपल्या आरोग्यावर उलटा परिणाम सुद्धा होऊ शकतो.

इंटरनेटवरील माहिती आपले आजारपण कसे वाढवू शकते याचे उदाहरण म्हणजे, जेव्हा आपल्याला डोकेदुखी होते, तेव्हा कारण शोधण्यासाठी सर्च केल्यास ते किरकोळ कारणांपासून ब्रेन ट्यूमरपर्यंतची माहिती देते.

मनुष्य वृत्तीनुसार आपण गंभीर गोष्टीला प्राधान्य देतो आणि ब्रेन ट्यूमरच्या भीतीने झोप उडते, घाबरणे, अस्वस्थता होऊ लागते. यामुळे समस्या आणखी वाढते. यास मेडिकल सायन्समध्ये Cyberchondria म्हणतात.

Cyberchondria पासून बचाव करा करावा?

इंटरनेटवरील माहितीला अंतिम सत्य मानू नका.

त्याच वेबसाइटवर जा, ज्या एक्सपर्टद्वारे माहिती देतात, सक्रिय आहेत.

कोणताही आजार, लक्षण असल्यास डॉक्टरांकडे जा.

डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीही सेवन करू नका.

Web Title :-  Cyberchondria | blindtrust on health information available on internet is dangerous for your health know about cyberchondria

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अमेरिकन कंपनीच्या फसवणूकप्रकरणी ‘पॅकस्पेस एंटरप्राइजेस’च्या हार्दिक ओसवाल, दीपक सुतार आणि प्रदीप तांगडे यांच्याविरूध्द गुन्हा

Shirur Crime | दुर्दैवी ! 4 वर्षाच्या मुलासह आईची आत्महत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; शिरुर तालुक्यातील खळबळजनक घटना

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला सुद्धा LPG वर सबसिडी मिळत नाही का?, चेक करा ‘हे’ कारण तर नाही ना? खुप सोपी आहे पद्धत, जाणून घ्या