Cyclone Biporjoy Update | ‘बिपरजॉय चक्रीवादळ’ येत्या 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार; गुजरात-महाराष्ट्र प्रशासन अलर्टवर

मुंबई/नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Cyclone Biporjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव (Cyclone Biporjoy Update) देशभर दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने हिंसक रूप धारण केले आहे. गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) चक्रीवादळामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. पाकिस्तानातील (Pakistan) मांडवी आणि कराची किनारपट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना देखील हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.

हा बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biporjoy Update) ट्रेलर असल्याचे म्हटले जात आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग ताशी 150 किमी आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहे. तटरक्षक दल (Coast Guard) आणि एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागातील सुमारे तीस हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Indiametdept/status/1668817518079918080?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD), बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी मोरबी, द्वारका, जामनगर, राजकोट, पोरबंदर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातही नुकसान होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडू शकतात, मातीची घरे कोसळू शकतात, काँक्रीटच्या घरांचे नुकसान होऊ शकते आणि दूरसंचार आणि रेल्वेच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो.

“बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. कच्छ भागात याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. 15 जूनला चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग किनाऱ्याजवळ 125-135 किमी प्रतितास असेल. सध्या अरबी समुद्रातील हे वादळ 8 किमी प्रतितास वेगाने जवळपास वायव्य दिशेकडे सरकत आहे.”
– एम. महापात्रा, महासंचालक हवामान विभाग

Web Title :  Cyclone Biporjoy Update | cyclone biparjoy updates landfall gujarat maharashtra thursday afternoon rainfall imd alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Disaster Management Pune – Mumbai | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पुण्यातील आजचा दर काय? जाणून घ्या