चक्रीवादळ ‘वायू’चा अलर्ट, गुजरातसह महाराष्ट्रावर वादळाचा ‘परिणाम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामान विभागाने चक्री वादळ ‘वायू’ येण्याचा अलर्ट दिला आहे. हे वादळ अरबी समुद्रातून भारताच्या किनारपट्टीवर सरकत आहे. हे वादळ लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण महाराष्ट्रात किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते हे वादळ 12 – 13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात पोहचण्याची शक्यता आहे. या वादळमुळे पुढील दोन तासात राजस्थान च्या पिलानी, सादुलपूर तसेच हरियाणाच्या लोहारु आणि त्या आसपासच्या भागात धुळीचे वाद आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या मते, अरबी समुद्रात असलेले हे चक्री वादळ वायू 75 किलोमीटर ते 135 किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे सरकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावेळी वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 110 ते 120 किलोमीटर प्रतितास असेल अशी शक्यता आहे.

हे चक्री वादळ 12 – 13 जूनला सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोहचू शकते. वादळमुळे गांधीनगर, अहमदाबाद आणि राजकोल या किनारी भागांना फडका बसण्याची शक्यता आहे. तसेच वेरावल, सुरत आणि भुज या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडी या हवामान संस्थेच्या मते, 90 – 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या उत्तरपुर्व भागात याचा वेग वाढून 115 किलोमीटर प्रतितास होऊ शकतो.

हवामान विभागाकडून सांगण्यात आल्यानुसार, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या किनारी भागात या वाऱ्याचा वेग 50 – 60 किलोमीटर होण्याची शक्यता आहे. येथे 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर 13 जूनला समुद्र किनारी असलेल्या भागात 110 – 120 किलोमीटर पासून 135 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात असलेल्या भागांना हे वायू वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे,परंतू याचा मोठा परिणाम होणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.