DA | केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA वाढल्यानंतर किती वाढणार सॅलरी आणि किती मिळणार PF चे पैसे? ‘या’ 10 पॉईंटद्वारे समजून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 14 जुलै 2021 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने (Modi Cabinet) 1 जुलैपासून 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठी वाढीव महागाई भत्ता (DA) देण्यास मंजूरी दिली आहे. कॅबिनेटच्या निर्णयाची घोषणा करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी म्हटले की, डीए वाढीमुळे (DA Hike) 1.14 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना (central government employees and pensioners) लाभ होईल.

मंजूर डीए 28 टक्के आहे, ज्याचा अर्थ केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा डीए सध्याच्या 17 टक्केवरून 28 टक्के झाला आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 11 टक्केची वाढ नोंदली जाईल. वाढीव डीएमुळे कर्मचार्‍यांच्या पगारात किती वाढ होणार आणि पीएफचे पैसे किती मिळणार हे कसे जाणून घ्यायचे ते समजून घेवूयात…

 

जाणून घ्या यासंबंधीच्या 10 महत्वाच्या गोष्टी…

1. DA आणि DR चा दर 11 टक्के वाढेल कारण सध्याचा डीए दर 17 टक्के आहे. तर मंजूर डीए आणि डीआर 1 जुलै 2021 पासून 28 टक्के आहे.

2. डीए वाढीने मासिक पीएफमध्ये सुद्धा वाढ होईल. तर, रिटायर्मेंटसाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) आणि ग्रॅच्युटी (Gratuity) मध्ये सुद्धा वाढ होण्याची आशा आहे.

3. कोरोनामुळे सरकारने डीए आणि डीआरचे तीन अतिरिक्त हप्ते रोखले होते. हे हप्ते एक जानेवारी 2020, 1 जुलै, 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून बाकी होते.

4. डीए आणि डीआरमधील वाढीमुळे सरकारी खजिन्यावर 34,401 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

5. या आर्थिक वर्षात सरकारी खजिन्यावर 22,934.56 कोटीचा भार पडेल.

6. डीए आणि डीआर वाढ जुलैपासून दिली जाईल म्हणजे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै 2021 पासून वाढलेला डीए आणि डीआर मिळेल.

7. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सुद्धा सांगितले की, जानेवारी 2020 पासून जून 2021 च्या कालावधीसाठी डीए आणि डीआरचे दर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी 17 टक्के राहतील.

8. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून बाकी डीए आणि डीआर एरियरचे तीन हप्ते दिले जाणार नाहीत.

9. मार्च 2020 मध्ये, केंद्राने 4 टक्के डीएची घोषणा केली होती,
ज्याचा अर्थ आहे की केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी डीए जानेवारी 2020 पासून 21 टक्के झाला असेल,
परंतु डीए आणि डीआर लाभ फ्रीज झाल्याने डीए जून 2021 पर्यंत 17 टक्केवर राहिला.

10. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलैपासून डीए आणि डीआरचे तीन हप्ते देण्यास मंजूरी दिली आहे.
यात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 च्या कालावधीसाठी थकीतचे पेमेंट केले जाणार नाही.

Web Titel :- DA | 7th pay commission check how da hike impact on salary pf contribution and other benefits details here

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या