DA Hike | यावेळी 6 टक्के वाढू शकतो कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता, तुमच्या पगारात किती रुपयांची होई वाढ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार पुढील महिन्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता वाढविण्याचा (DA Hike) निर्णय घेऊ शकते. यावेळी डीएमध्ये ऐतिहासिक वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

 

3 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये महागाई भत्त्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. यावेळी डीए 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

 

असे झाल्यास कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे पगारातही लक्षणीय वाढ होणार आहे.

 

का होणार आहे एवढी मोठी वाढ
नावाप्रमाणेच हा भत्ता कर्मचार्‍यांना महागाईच्या बदल्यात दिला जातो. किरकोळ महागाईचा दर यंदा 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. (DA Hike)

 

ऑल इंडिया रिटेल प्राइस इंडेक्स (AICPI) नुसार, यावेळी महागाई भत्त्यातही 5 ते 6 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

असे झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनात त्यांच्या बेसिकनुसार हजारो रुपयांची वाढ होईल.

या मुद्द्यांवरही होऊ शकतो निर्णय
कॅबिनेट बैठकीत फिटमेंट फॅक्टर बाबतही मोदी सरकार निर्णय देऊ शकते. कर्मचार्‍यांच्या पगारवाढीसाठी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते, असा अंदाज आहे.

 

याशिवाय, कोरोनाच्या काळात गोठवलेल्या 18 महिन्यांच्या डीए बाबतही सरकार आपली बॅग उघडू शकते. जानेवारी 2020 ते जून 2021 या कोरोना कालावधीत कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देण्यात आला नाही.

 

मूळ वेतन 28,450 रुपये असेल तर किती होईल वाढ
जर एखाद्याचा मूळ पगार 28,450 रुपये असेल, तर 40 टक्के नवीन महागाई भत्ता लागू झाल्यानंतर त्यात किती रुपयांनी वाढ होईल? त्याचे संपूर्ण गणित खालीलप्रमाणे आहे.

 

कर्मचार्‍याचे मूळ वेतन 28,450 रुपये

नवीन महागाई भत्ता 40 टक्के म्हणजेच 11,380 रुपये

सध्याचा महागाई भत्ता 34 टक्के म्हणजे 9,673 रुपये

मासिक पगारातील वाढीव महागाई भत्ता 11,380-9,673 रुपये म्हणजेच 1,707 रुपये

वार्षिक वेतनवाढ 20,484 रुपये होईल

 

Web Title :- DA Hike | 7th pay commission dearness allowance may hike by 6 percent what is impact on your salary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

 

Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

 

Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा