Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडचा (Metro Car Shed) मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) आरे कारशेडवर घातलेली बंदी (Ban) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठवली आहे. त्यामुळे कारशेड आरे (Metro Car Shed) येथे होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. सरकारने आरेतील कारशेड वरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे.

 

मागील काही महिन्यांपासून मुंबईत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामांवरील बंदी एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. त्यामुळे आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरु झाल्या आहेत. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis Government) काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती.

 

यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government) आरे कॉलनीमधील होणारा हा प्रकल्प रद्द केला होता.
त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे जाहीर केले होते.
यानंतर आता आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

 

Web Title :- Metro Car Shed | cm eknath shinde roll back ban order from aarey metro car shed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Railway Concession to Senior Citizen | ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात कधीपासून मिळणार सवलत? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी माहिती

 

Shivsena | ‘शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते’; केंद्रीय राज्यमंत्र्याचा गंभीर आरोप

 

Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’