‘दबंग’ अधिक्षकानंतर ‘सिंघम’ अधिक्षक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

राजकीय दबाव झुगारून धडक कारवाई करणारा, कामचुकार पोलिसांना कामाला लावणारा, जमिनीच्या व्यवहारात हितसंबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवणारा, कायदेशीर कारवाई करत हद्दीतील अवैध धंद्याचा नाश करणारा असा दबंग अधिकारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची बदली झाली. आणि त्यांच्या जागी साताऱ्या सारख्या शहरातील, जिल्ह्यातील सराईत गुंडांचे पेकाट मोडलेला, शहरातील अवैध वाहतूक, धंदे बंद करणारा, सर्व सामान्य जनतेला न्याय देणारा असा सिंघम अधिकारी सातारचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’0979019710′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b52710d-92df-11e8-8d2c-73185364cff8′]

संवेदनशील, नक्षलवादी असणाऱ्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे संदीप पाटील यांची साताऱ्यात बदली झाली. तेथून त्यांची बदली पुणे ग्रामीणला झाली आहे. शांत आणि संयमी गुण असणाऱ्या अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील खासगी सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लूटमार करणाऱ्या टोळींचा अक्षरश: बिमोड केला. एवढेच नव्हे तर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला. शंभरहून अधिकजणांना त्यांनी तडीपार केले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच जिल्हा पोलीस दलाचा ‘क्राईम रेट’ कमी झाला. खातेअंतर्गत शिस्त लागावी, यासाठी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आत्तापर्यंत ३० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले आहे. एका मागून एक अशा तडीपारीच्या कारवाई करत त्यांनी २५ टोळ्यांतील शंभरजणांना तडीपार केले. हीच पद्धत त्यांनी मोक्कामध्ये लावली. असेही सिंघम पोलीस अधीक्षक आता आपल्या पुणे पोलीस अधीक्षकपदी रुजू होणार आहेत.

मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झालेले सुवेझ हक्क यांनीही स्वतःची आणि पोलीस खात्याची एक वेगळी ओळख करुन दिली. कोणत्याही राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या दबावाला न जुमानता धडक कारवाई केली. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तडीपार, मोक्काअंतर्गत कारवाई केल्या. जिल्हयातील लॅण्ड माफियांवर चाफ आणला तर पोलीस खात्यातील लॅण्ड माफियांची दुकानदारी बंद केली. अवैध धंदे उध्वस्त केले. यामुळे त्यांनी त्यांच्या कामातून नागरिकांच्या मनात चांगली छाप तयार केली.