कोरोनाच्या प्रकरणांत वाढ कायम ! 2021 मध्ये प्रथमच 300 पेक्षा जास्त मृत्यू, नवे रूग्ण देखील 163 दिवसांमधील सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या 24 तासांत भारतात कोविड – 19 चे 62,714 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे या वर्षात एकाच दिवसातील सर्वाधिक आहेत. यासह, देशात संक्रमणाची एकूण प्रकरणे वाढून 1,19,71,624 वर गेली आहेत, तर 2021 मध्ये एकाच दिवसात आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 300 च्या वर गेेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाव्हायरसचे प्रकरणे सलग 18 व्या दिवशी वाढली आहेत. देशात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या वाढून 4,86,310 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 4.06 टक्के आहे, तर निरोगी लोकांचे प्रमाण 94.58 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62,714 नवीन संसर्गाची नोंद झाली, जी 16 ऑक्टोबर 2020 नंतरची सर्वाधिक संख्या आहे, तर 312 मृतांच्या संख्येबरोबर मृतांची संख्या 1,61,552 वर गेली आहे. यापूर्वी 25 डिसेंबर 2020 रोजी एका दिवसात 336 लोक मरण पावले होते. त्याच वेळी, 16 ऑक्टोबर रोजी 24 तासांत 63,371 नवीन संक्रमणाची प्रकरणे नोंदविली गेली. आकडेवारीनुसार आतापर्यंत 1,13,23,762 लोक या आजाराने बरे झाले आहेत, तर मृत्यूची संख्या 1.35 टक्के आहे.

देशात अशा प्रकारे वाढली कोविड -19 प्रकरणे
7 ऑगस्ट रोजी भारतात कोविड -19 प्रकरणे 20 लाखांच्या पुढे गेली होती. यानंतर 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख आणि 16 सप्टेंबरला संसर्गाने 50 लाखांचा आकडा ओलांडला. 28 सप्टेंबर रोजी जागतिक साथीच्या आजाराचे प्रमाण 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटीच्या आसपास हा आकडा पोहोचला.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांतही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार 27 मार्चपर्यंत 24,09,50,842 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. शनिवारी 11,81,289 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गेल्या 24 तासात मृत्यू झालेल्या 312 लोकांपैकी महाराष्ट्रात 166, पंजाबमध्ये 45, केरळमध्ये 14, छत्तीसगडमध्ये 13 आणि दिल्लीत 10 जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत देशातील 1,61,552 लोकांचे प्राण गमावले आहेत. यापैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात 54,073, तामिळनाडूमध्ये 12,659, कर्नाटकमध्ये 12,492, दिल्लीत 10,997, पश्चिम बंगालमध्ये 10,322, उत्तर प्रदेशात 8,783 आणि आंध्र प्रदेशात 7,203 आणि पंजाबमध्ये 6,621 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्के लोकांना इतर आजार आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीशी आमचा डेटा जुळत आहे.”