वैवाहिक जीवनाला रामराम ठोकत मालदीवमध्ये ‘मजा’ मारतेय ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अदाकारा दलजीत कौर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत आली आहे. पर्सनल लाईफ असो प्रोफेशनल लाईफ असो चर्चेत राहण्याची एकही संधी दलजीतनं सोडली नाही. दलीजीतच्या सुपर बोल्ड अवताराचे चाहते नेहमीच दीवाने राहिले आहेत. सध्या आपल्या हॉट अवताराला घेऊन दलजीत चर्चेत आली आहे.

सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी दलजीत सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दलजीतनं काही फोटो शेअर केले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. दलजीत वेस्टर्न लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. 36 वर्षीय दलजीत आजही खूप हॉट आणि फिट दिसते. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सलमान खाननंही तिच्या वयाचं कौतुक केलं होतं. शोमध्ये तिने ग्रीन अँड गोल्डन कलरचा ड्रेस घालून एन्ट्री केली होती. सलमान तिला म्हणाला होता की, “तुझ्या स्किनमुळे तुझ्या वयाचा अदाजच येत नाही.”

दलजीतच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दलजीत आणि तिचा पती शालीन भनोट यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला होता. दलजीत आपल्या 6 वर्षाच्या मुलासोबत एकटीच रहाते.

दलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2004 साली आलेल्या मंशा या मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. नुकतीच ती बिग बॉसच्या 13 व्या सीजनमध्ये दिसली होती. दलजीतनं सीआयडी, आहट, और रात होने को है अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. याशिवाय नच बलिए 4 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा