पैशा अभावी तिवरे धरण फुटलं, १० मिनीटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं ; जलसंपदा मंंत्री महाजनांची कुबली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑलाइन – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही शासनाने निधी न दिल्याने हे धरण फुटल्याची माहिती पुढे आली आहे. या धरण फुटीला प्रशासनाचा बेजबादारपणा कारणीभूत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

https://youtu.be/2T3dq0SBtY0

Image result for तिवरे धरण फुटले

धरणाला भगदाड पडल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांनी या धरणाबाबत तक्रारी केल्या होता, याची कबुली दिली असून धरण फुटीची उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

शंभर वर्षापूर्वी बांधलेली धरणे आजही भक्कम असताना गेल्या १० -२० वर्षात बांधलेली धरणे मात्र भष्ट्राचारामुळे काही वर्षात कमकुवत झाली असल्याचे राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. तिवरे धरणाला भगदाड पडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. लघुपाटबंधारे खात्याने या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्या प्रस्तावाबाबत अनेक स्मरण पत्रेही देण्यात आली होती. तरीही जलसंपदा खात्याकडून निधी मिळाला नाही. दुसरीकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर काही तरी केले हे दाखविण्यासाठी धरणाला ज्या ठिकाणी भेगा दिसत होत्या. त्या ठिकाणी दोन डंपर माती टाकण्यात आली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Image result for तिवरे धरण फुटले

ग्रामस्थ गाढ झोपेत असता धरण फुटल्याने एक गाव गुराढोरांसह वाहून गेले आहे. २४ बेपत्ता लोकांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे. रात्र असल्याने आणि त्यात पाऊस सुरु असल्याने धरण फुटल्याची गावकऱ्यांना कल्पना आली नाही.

मात्र, अचानेक वाडीवस्त्यात पाणी कसे घुसले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना धरण फुटल्याचे समजले. तोपर्यंत धरणाच्या पाण्याच्या पुरात अनेक घरे वाहून गेली होती. १५ वर्षांपूर्वी पुण्यातील टेमघर हे बांधण्यासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा आता त्याच्या दुरुस्तीवर अधिक खर्च करावा लागत असून दुरुस्तीसाठी हे धरण लवकर रिकामे करावे लागत असल्याने पुण्यात पाणीटंचाई जाणवते.

Image result for तिवरे धरण फुटले

अशीच परिस्थिती चिपळूणमधील या तिवरे धरणाची आहे. मातीचे हे धरण २०१२ मध्ये बांधून पूर्ण झाले आहे. एका बाजूला शंभर वर्षांपूर्वी बांधलेले राधानगरी हे त्या काळातील सर्वात मोठे धरण अजूनही भक्कम आहे. मात्र, २०१२ साली बांधून पूर्ण झाले व केवळ २.४५२ दशलक्ष घनमीटर/०.०८ टीएमसी पाणी क्षमतेचा हा छोटा बंधाऱ्याला सात वर्षाच्या आतच भेगा पडल्या. त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापासून निधी मागितला जात होता. पण, शासनाने ना निधी दिला ना इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ का आली याची चौकशी केली. त्यामुळे आज ही परिस्थिती ओढविली आहे.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ