‘कोरोना’नंतर अमेरिकेसमोर ‘हे’ नवीन महासंकट, 8 शहरात अतिदक्षतेचा इशारा

कोरोनाच्या महासंकटानंतर आता अमेरिके(America)समोर आणखी एक नवं संकट उभं टाकले आहे. या संकटामुळे अमेरिकेतील आठ शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिके(America)च्या टेक्सास परिसरात नदी किनारी प्रशासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात अमिबा सारखा विषाणू आढळला आहे. तो नाकावाटे जाऊन थेट माणसांच्या मेंदूत शिरतो अन् मेंदुला खातो.

मानवी मेंदूवर हल्ला
या जीवघेण्या अमिबामुळं एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकन प्रशासन या नवीन विषाणूंच्या शोधात आहे. सध्या येथील नागरिकांना सरकारी पाण्याचा उपयोग करण्यास प्रशासनानं मनाई केली आहे. हे पाणी न वापरण्याचं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे.

आठ शहरात अतिदक्षतेचा इशारा
टेक्सासचे प्रशासकीय अधिकारी ग्रेग एबॅाट यांनी एक आदेश काढला आहे. त्यानुसार परिसरातील आठ शहरामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हा अमिबासारखा विषाणू टेक्सासच्या जैक्सन तलावात आढळला आहे. हा विषाणू लगेचच रंग बदलत असल्याने ही सर्वात धोकादायक बाब आहे.

११ वर्षापूर्वीहा पसरला होता हा संसर्ग
या नव्या विषाणूला नेगलेरिया फाउलरली (Naegleria fowleri)नाव दिलं आहे. हा विषाणू मानवासाठी धोकादायक ठरत आहेत. ११ वर्षापूर्वी २००८-२००९मध्ये हा विषाणूंचा संसर्ग पसरला होता. यात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १९६२ पासून २०१८ पर्यंत अमेरिकेत या विषाणूमुळं १४५ जण बाधित झाले आहेत.

नाकाच्या माध्यमातून शिरकाव
स्वच्छ पाण्यात हा विषाणू आढळतो. तो फक्त मायक्रोफोनच्या माध्यमातून दिसतो. तो पाण्यातून माणसाच्या नाकात शिरतो. तेथून तो मेंदूत शिरतो अन् मेंदू खातो. काही तज्ज्ञांच्यामते, या विषाणूचे संसर्ग कमी आहे.

पाण्यात का आढळतो विषाणू
पाण्यात हा विषाणू आढळल्याचे प्रमुख कारण म्हणजे अशा तलावातील पाण्याची नियमीत स्वच्छता न केल्यामुळे अशा प्रकारचे विषाणू या पाण्यात आढळण्याची शक्यता असते. अशा पाण्यापासून सावधान राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.