Dangerous Apps | विना परवानगी फोनमध्ये स्वताच इन्स्टॉल होताहेत काही अ‍ॅप, धोक्यात प्रायव्हसी; ‘या’ पध्दतीनं करा बचाव

नवी दिल्ली : Dangerous Apps | काही अँड्रॉईड अ‍ॅप (Dangerous Apps) कथित प्रकारे वापरकर्त्याच्या सहमतीशिवाय स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होत आहेत. Reddit थ्रेडने असे अनेक वापरकर्ते पाहिले आहेत ज्यांनी अशाप्रकारच्या समस्यांचा सामना केला आहे. असेच एक अँड्राईड अ‍ॅपसुद्धा गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड आढळले आहे. यामुळे इतर मालेशियस अ‍ॅक्टर्ससुद्धा स्टोअरची सुरक्षा बायपास करू शकतात.

हे अ‍ॅप विना परवानगी स्वताच होतेय डाऊनलोड

या अ‍ॅपचे नाव ‘वेदर होम-लाईव्ह रडार अलर्ट आणि विजेट‘ आहे. हे अ‍ॅप अजूनही गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड असून ऑटोमॅटिक डाऊनलोड (Dangerous Apps) होत आहे. हे थ्रेड त्या काही जाहीराती दाखवते ज्यासाठी डाऊनलोड झाले आहे. वापरकर्त्याने ऑप्ट-आऊट केल्यानंतर सुद्धा, अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये डाऊनलोड झाले.

रिव्ह्यूमध्ये आहे समस्या

गुगल प्ले स्टोअरवर अ‍ॅप्लिकेशनचे रिव्ह्यू सुद्धा ही समस्या मांडत आहेत. काही वापरकर्त्यांनी हा सुद्धा दावा केला आहे की, जर हे हवामान अ‍ॅप डिफॉल्ट म्हणून निवडले गेले तर ते होम स्क्रीनचा पूर्ण लेआऊट बदलून टाकते.

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलमधील भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

गेम अ‍ॅप ठरत आहेत कारणीभूत

एका रिव्ह्यूमध्ये हे सुद्धा लिहिले आहे की, वॉर्निंग, हे अ‍ॅप परवानगी न घेता डाऊनलोड होत आहे. माझ्याकडे एका गेमवर अ‍ॅड पॉपअप होते त्यावर मी क्लिक केल्यानंतर हे अ‍ॅप डाऊनलोड झाले.

यूजर्स झालेत त्रस्त

हे सतत एक जाहीरात पॉप अप करते, जाहीरात रद्द केली तरी काहीही उपयोग होत नाही.
हे अ‍ॅप ब्लॉक करता आले असते तर किती बरे झाले असते, असे एका यूजरने म्हटले आहे.

अगोदर रिव्ह्यू पहा

डेव्हलपर्सने तक्रारीला उत्तर देताना म्हटले की, ते याकडे लक्ष देत आहेत.
आणखी एका रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे की, एखादी जाहिरात बंद करण्याच्या प्रयत्नानंतरच हे अ‍ॅप आपोआप डाऊनलोड झाले आहे.
मला ते नको होते.

बचावासाठी कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी रिव्ह्यू पहा, जाहिरातींवर क्लिक करू नका,
जाहिरात कॅन्सल करण्याचा प्रयत्न न करता मुळ अ‍ॅप्लीकेशनच बंद किंवा ब्लॉक करून टाका.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Dangerous Apps | alert some google play store apps are automatically installed in the phone without permission privacy in danger

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update