Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द 

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी (DHFL loan case) केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून (Pune Police) लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान, राणे कुटुंबीयांनी थकवलेले पैसे भरल्याची माहिती बँकेने पुणे पोलिसांना (Pune Police) दिली. त्यामुळे पुणे पोलिसांनी राणे कुटुंबीयांला बजावलेली लुकाआऊट नोटीस (Lookout notice)  रद्द केली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta) यांनी दिली.

डीएचएफएल बँकेकडून घेतलेले 65 कोटी रुपयांपैकी 61 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज थकवल्या प्रकरणी निलम राणे आणि नितेश राणे यांना पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. ही नोटीस मागील महिन्यात जारी करण्यात आली होती. यामध्ये राणे कुटुंबासह 30 जणांचा समावेश होता. दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (Diwan Housing Finance Ltd.) या कंपनीने यासंदर्भात केंद्र सरकारकडे (Central Government) तक्रार केली होती.

पुणे गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांनी 3 सप्टेबर रोजी लुकआऊट नोटीस बजावली होती. डीएचएफएलकडून पुणे पोलिसांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले. त्यात संबंधितांनी सर्व पैसे भरल्याचे कळविले. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) जारी केलेली लुकआऊट नोटीस मागे घेण्यात आली आहे.

हे देखील वाचा

CBSE Term 1 Board Exam Dates | सीबीएसई इयत्ता 10, 12वी बोर्ड टर्म 1 परीक्षेचे वेळापत्रक 18 ऑक्टोबरला होणार जारी

Pune Crime | परस्पर फ्लॅट विकून महिलेची 18 लाखाची फसवणूक, ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर FIR

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Police | Pune police cancels ‘lookout notice’ on Neelam Rane and Nitesh Rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update