Dangerous Combination With Eggs | अंड्यांसोबत ‘हे’ पदार्थ खाऊ नये अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑलनाइन टीम – Dangerous Combination With Eggs | अंडी हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत लोकांना ते खायला आवडते. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील ऊर्जेसोबतच अंड्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही योग्य राहते. पण फार कमी लोकांना हे माहित असेल की अशा अनेक गोष्टी अंड्यांसोबत खाल्ल्याने (Dangerous Combination With Eggs) अ‍ॅलर्जीसारख्या समस्या निर्माण होतात, तसेच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अंड्यांसोबत खाऊ नयेत.

 

अंड्यांसोबत मासे खाऊ नका (Avoid Eggs with Fish)

उकडलेले अंडे माशासोबत कधीही खाऊ नये. त्याचे मिश्रण शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. याच्या सेवनामुळे त्वचेच्या ऍलर्जीच्या समस्याही उद्भवू शकतात (Dangerous Combination With Eggs).

 

अंडी सह साखर (Avoid Eggs With Sugar)

अंड्यांसोबत साखर खाणे टाळा. अंडी आणि साखरेमध्ये अमिनो अ‍ॅसिड असते. याचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

लिंबू आणि अंडी (Avoid Eggs With Lemon)

लिंबू सामान्यतः लोक जेवणात चव वाढवण्यासाठी वापरतात. पण अंड्यांसोबत लिंबू सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

 

अंडी आणि चीज (Avoid Eggs With Cheese )

अंडी आणि कॉटेज चीज दोन्हीमध्ये प्रथिने जास्त असतात. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन करू नका. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

 

 केळी आणि अंडी  (Eggs With Bananas)

अंडी खाल्ल्यानंतर किंवा अंडी खाताना लगेच केळी खाणे टाळावे. एकत्र सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.

 

अंडी आणि चहा (Eggs With Tea)

चहा प्यायल्यानंतर लगेच अंडी कधीही खाऊ नयेत. असे केल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

 

 

Web Title :- Dangerous Combination With Eggs | dangerous food combination avoid eating these food with egg harmful for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crypto Scam-Fake Coin | भारतात 1200 कोटींचा क्रिप्टोकरन्सी घोटाळा, लालच दाखवून लोकांची फिल्मी स्टाईलने फसवणूक

LIC Jeevan Pragati Plan | दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाख रुपयांचा मोठा फंड, जाणून घ्या सविस्तर

Demat Account Increased in India | लॉकडाऊन आणि WFH ने शेअर मार्केटला नवीन गुंतवणूकदार दिले, दोन वर्षांत दुप्पट झाली डिमॅट अकाऊंट