डॅनी डेन्झोपा यांची प्रेयसी असलेली ‘ही’ अभिनेत्री ब्रेकअप नंतरही खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक नाव म्हणजे डॅनी डेन्झोपा आज आपण डॅनी यांच्या खासगी आयुष्याबाबत काही माहिती जाणून घेणार आहोत ज्या कदाचितच तुम्हाला माहिती असतील. तसं तर डॅनी यांचं खासगी आयुष्य मीडियापासून कधीच लपलं नाही. ते एका फेमस ॲक्ट्रेससोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी अनेकवेळा याबाबत कबुली दिली आहे. डॅनी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबाबत डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

मुलाखतीत बोलताना डॅनी म्हणाले की, “मी आणि परवीन एकमेकांना भेटलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळपास चार वर्ष आम्ही एकत्र राहिलो. त्याकाळी एकत्र राहणं ही खूप मोठी गोष्ट होती. आम्ही सोबत खूप चांगला वेळ घालवला. काही काळानंतर आम्ही वेगळं व्हायचं ठरवलं. परंतु त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदी आला. कबीरसोबत ब्रेकअपनंतर काही वर्ष ती महेश भट्टसोबत नात्यात होती. आम्ही दोघे अनेक वर्षे जुहूमधील एकाच सोसायटीत रहात होतो.”

पुढे बोलताना डॅनी म्हणाले की, “आम्ही वेगळे झाल्यानंतरही अनेकदा ती मला जेवायला घरी बोलवायची. त्यावेळी मी अभिनेत्री किमसोबत नात्यात होतो. परंतु याची पर्वा मात्र परवीनला नव्हती. ती कोणत्याही वेळी माझ्या घरी येत होती. किमसाठी हे समजणे खूपच अवघड होते. काहीवेळा तर किमचे शुटींग संपल्यानंतर मी तिला सेटवरून माझ्या घरी घेऊन यायचो तर माझ्या घरात परवीन असायची. ती चक्क बेडरूमध्ये बसून व्हीसीआरवर सिनेमा पाहत राहायची. तिचे हे वागणे मला आणि किमलाही विचित्र वाटायचे. परंतु यावर बोलताना ती म्हणायची, “आपण केवळ फ्रेंड्स आहोत. आपल्यात तसे काहीही नाहीये.” असे म्हणत ती जोराजोरात हसायची.

डॅनी डेन्झोपा यांच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, नुकतेच त्यांनी मनकर्णिका क्वीन ऑफ झाँसी या सिनेमात काम केले आहे. याशिवाय, त्यांच्या अग्निपथ, देवता, सनम बेवफा, हम, खुदा गवाह, क्रांतीवीर, विजयपथ, घातक, बरसात या सर्व सिनेमांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

Loading...
You might also like