Dapoli Crime News | बोरमाळेसाठी महिलेने केला 86 वर्षीय वृद्धेचा खून; महिलेला पोलिसांकडून अटक

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – Dapoli Crime News | वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळेसाठी तिचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना आहे. ही घटना रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील (Dapoli Crime News) विसापूर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक (Arrested) केली आहे. सृष्टी कदम (Srushti Kadam) (वय, 37) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर दीपावती घाग (Deepawati Ghag) (वय 86) असे खून झालेल्या वृद्ध महिले नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दीपावती घाग यांचे पती सिताराम घाग (Sitaram Ghag) यांचे 1994 साली निधन झाले. ते अधिकारी पदावर कार्यरत होते. दीपावती यांना 7 मुली आणि 2 मुले आहेत. विसापूरमध्ये त्यांचे घर मोठे असून ते दुमजली आहे. दरम्यान त्यांच्या मदतीसाठी गावातील एक महिला येत असे. पण सकाळी आलेल्या या महिला निघून गेल्यानंतर दीपावती या घरी दिवसभर एकट्याच असायच्या. दरम्यान ज्या महिलेने खून केला ती महिला सृष्टी कदम हे दीपावती यांच्या परिचयाची होती. सृष्टी कदम विसापूर गावातील रहिवासी आहे. दरम्यान बोरमाळेसाठी सृष्टी कदम हिने पाळत ठेवली होती. (Dapoli Crime News)

सृष्टी कदमने पाणी पिण्याच्या निमित्ताने दीपावती यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश केला. यावेळी तिने मागील दाराची कडी काढून ठेवली होती. त्यानंतर मध्यरात्री सृष्टी पुन्हा एकदा माळ चोरीच्या उद्देशाने घरात शिरली. यावेळी बोरमाळ चोरत असताना दीपावती घाग यांना जाग आली. आपली चोरी पकडली जाणार या भीतीने सृष्टी हिने दीपावती यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे जागेवरच कोसळलेल्या दीपावली यांच्या अंगावरील दागिने चोरून पसार झाली.

दरम्यान, पोलीस चौकशीमध्ये सृष्टी कदम ही उडवाउडवीच उत्तरे देत होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
त्यानंतर तिला दापोली पोलीस ठाण्यात (Dapoli Police Station) चौकशीसाठी आणले.
यावेळी सृष्टी कदम हिने आपणच खून केल्याची कबुली दिली. तसेच तिने चोरलेले दागिने देखील पोलिसांच्या स्वाधीन केले.
सृष्टी या महिलेवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

Web Title : Dapoli Crime News | 37 year old woman killed old women for gold necklace accused arrested within 12 hours by ratnagiri police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा