धक्‍कादायक ! मुलीनं घडवून आणला आईवर बलात्कार, प्रकरणाला वेगळं वळण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एका आईने आपल्या मुलीला फसवण्यासाठी सामूहिक बलात्कार सारखी घृणास्पद घटना घडवून आणली. या प्रकरणाची चौकशी करत असताना धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या खुलाश्यानंतर पोलिसांनी पती पत्नीला अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी बुलंदशहरात एका व्यक्तीने घरात चोरटयांनी घुसून जबरी चोरी करत घरातील महिलेवर बलात्कार देखील केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या पतीकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जातीबाहेर लग्न केलेल्या आपल्या मुलीला फसवण्यासाठी या दाम्पत्याने हि खोटी बलात्काराची घटना घडवून आणली. त्याचबरोबर पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीत देखील तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या दाम्पत्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –