Daund MNS City President | मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने मनसेच्या दौंड शहराध्यक्षांचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Daund MNS City President | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवाच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला होता. मनसेने अचानक हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यातच औरंगाबादमध्येही (Aurangabad) झालेल्या सभेत मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न आणखी आक्रमकपणे मांडला. त्यामुळे मनसेत असणाऱ्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

 

राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भूमिका स्पष्ट केली त्यावेळी पुण्यातील (Pune) काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यानंतर मुंबईमध्येही (Mumbai) राजीनामा सत्र सुरू झाले. आता औरंगाबादची सभा झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत दौंडचे मनसे शहराध्यक्ष (Daund MNS City President) जमीर सय्यद (Jamir Syed) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 

जमीर सय्यद यांनी दिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की, ”मी जमीर सिकंदर सय्यद रा. गांधी चौक दौंड येथील रहिवासी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मी मनसे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे मी स्वत: महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
माझा राजीनामा सुधीर पाटसकर (Sudhir Patskar) यांनी मंजूर करावा ही नम्र विनंती.” असे त्यांनी म्हंटले आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Daund MNS City President | MNS chief raj thackeray statement hurt the feelings of the muslim community the resignation of the city president jameer syad in daund

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा