पुणे जिल्ह्यातील वनविभागाच्या जमिनींचे लवकरच निर्वनीकरन : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या जमिनीचे निर्वनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून खाजगी यंत्रणा नेमण्यात येणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वन विभागाने भूमिहीन शेतकरी तसेच इतर कारणासाठी जमीन वाटप केले आहे. वर्षानुवर्षे ह्या जमिनी शेतकरी कसत आहेत. परंतु त्यांना या जमिनीवर कर्ज घेता येत नाही. जमिन हस्तांतरित करता येत नाहीत. या जमिनीवरील राखीव वने असा शेरा असलेल्या जमिनींचे निर्वनीकरनाचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणेबाबत विधानसभेत तीन वेळा लक्षवेधी उपस्थित करून आवाज उठवला होता. त्या नंतर तत्कालीन राज्यसरकार ने १९८० पूर्वी वाटप केलेल्या जमिनीचे प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्याच्या संबधित एक शासन निर्णय काढला असून त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.

हि बाब आमदार कुल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे प्रस्ताव सादर करण्यासाठी खाजगी यंत्रणा नेमण्यात येणार असून त्याचा खर्च जिल्हा नियोजन मंडळाकडून करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –