बकरी ईद निमित्त दौंडमधून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – सांगली आणि कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामध्ये अनेक कुटुंबे होत्याची नव्हती झाली. या पुुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. बकरी ईदनिमित्त नमाज झाल्यानंतर मुस्लीम समाजाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा केली आहे.
daund
राज्यात अनेक ठिकाणी पुराने कहर केला असताना मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. दौंडमध्ये ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली असून या समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. तालुक्यातील मुस्लिम समाजाने यावेळी बकरी ईद साध्यापणाने साजरी करत पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत एक आदर्श निर्माण केला आहे.

दौंड शहरासह वरवंड, यवत, केडगाव या गावांमधूनही लाखो रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे यवतचे सामाजिक कार्यकर्ते समिर सय्यद यांनी सांगितले. एकट्या वरवंड गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने ईदच्या दिवशी पूरग्रस्तांना १८,७६१ रुपयांची रोख रक्कम वरवंड ग्रामस्थांकडे देण्यात आली ही रक्कम ग्रामस्थांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शफीक शेख, आशा खान व वरवंड येथील मुस्लिम समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like