Dearness Relief Hike | 3000 ते 9000 रुपयांपर्यंत वाढेल पेन्शन, सरकारने केली महागाई मदतीमध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dearness Relief Hike | सरकारने आता फ्रीडम फायटर्सची पेन्शन (freedom fighters pension Hike) सुद्धा वाढवली आहे. ही वाढ महागाई मदतीत (Dearness Relief Hike) वाढीने झाली आहे. सरकारने सर्व बँकांना सांगितले (DR Hike) आहे की, त्यांनी पेन्शनमध्ये वाढीच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे पालन करावे आणि ती लवकरात लवकर लागू करावी.

 

स्वातंत्र्य सैनिक पेन्शन धारकांच्या (pensioners) महागाई मदतीचे सुधारित दर 1 जुलै 2021 पासून लागू आहेत. या वाढीमुळे स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन 3000 रुपयांवरून 9000 रुपयांपर्यंत वाढेल. सोबतच त्यांना जुलैपासून 5 महिन्यांचा एरियरसुद्धा मिळेल.

 

3 टक्के वाढ
गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये संचालक एनआर शेखर राजू यांनी होम मिनिस्ट्रीच्या 28 जुलै 2021 च्या पत्राचा उल्लेख करण्याचे निर्देश दिले आहेत, जे स्वातंत्र्य सैनिक पेन्शनधारकांना 1 जुलै 2021 पासून 29% महागाई मदतीचे (DR) पेमेंट करण्यासंबंधी आहे.

 

अलिकडेच भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार, पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग, नवी दिल्लीद्वारे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या बाबत महागाई मदतीत 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. (Dearness Relief Hike)

यासाठी केंद्रीय स्वातंत्र्य सैनिक/पती/पत्नी/मुलगी पेन्शनधारकांना महगाई मदत 1 जुलै 2021 पासून 26% च्या सध्याच्या दरावरून वाढवून 29% करण्यात आली. 3% डीआर म्हणजे एकुण 29% वाढीनंतर पेन्शनधारकांच्या विविध श्रेणींसाठी पेन्शनची सुधारित रक्कम मिळेल.

 

आता किती मिळेल पेन्शन
Ex-Andaman Political prisoners/spouses ची पेन्शन 30,000 रुपये महिनावरून वाढून 38,700 रुपये करण्यात आली आहे.

जे Freedom fighters भारताच्या बाहेर पीडित होते. त्यांना 28,000 रुपयांवरून वाढवून 36,120 रुपये महिना पेन्शन मिळेल.

दुसर्‍या INA सह Freedom fighters ना 26,000 वरून वाढवून 33,540 महिना पेन्शन मिळेल.

Dependent parents/ eligible daughters ना 15,000 रुपयांवरून वाढवून 19,350 रुपये महिना पेन्शन मिळेल.

 

पेन्शनवर कापला जाणार नाही टीडीएस
संचालक एन. आर. शेकर राजू (N R SEKAR RAJU) यांच्यानुसार हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले की, मार्गदर्शक तत्व 06 ऑगस्ट 2014 नुसार केंद्रीय सन्मान पेन्शनबाबत टीडीएस (TDS) लागू नाही.

 

Web Title :- Dearness Relief Hike | dearness relief hike dr news dr hike news revised rates of dearness relief news to freedom fighter pensioners from 01 july 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SSC-HSC Board Exam | विद्यार्थ्यांना दिलासा ! दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जादा अर्धा तास वेळ

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा CM उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले – ‘…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा’

 

SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक मार्गात 23 डिसेंबरपासून बदल