Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा CM उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले – ‘…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाराष्ट्रात सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आजारपणाच्या मुद्द्यावरही चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी मानेच्या त्रासामुळे उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. यानंतर भाजपाने (BJP) मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तसेच, यावेळी आदित्य ठाकरेंकडे (Aditya Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देण्याचा देखील सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. असं म्हणत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ’45 दिवस राज्याच्या जनतेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बरे व्हा ना. तुमची प्रकृती ठीक नसेल तर चार्ज द्या. एक दिवस विदेशात जायचं असेल, तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कुणावर भरवसाच नाहीये. चला चार्ज तुम्ही ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे द्या. कुणीतरी माणूस हवा ना, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर आहे. या संस्कृतीला आपली मानणारा माणूस कुणाचं अहित चिंतणारच नाही. पण त्यामुळे तुम्ही राज्यावर अन्याय करू नका. एक फार मोठे नेते आजारी होते, तेव्हा दुसऱ्या नेत्याने त्यांना भेटून चौकशी केली, तेव्हा त्यांनी म्हटलं की सहानुभूती ही सामान्य माणसाला ठीक आहे, ती नेत्याला नाही चालत. त्यामुळेच तो नेता होतो,’ अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil targets cm uddhav thackeray on his absence for treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक मार्गात 23 डिसेंबरपासून बदल

Esha Gupta Bold-Hot Photos | ईशा गुप्ताच्या डिपनेक गाऊननं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा बोल्ड फोटो

Kiara Advani Bold Photo | कियारा अडवाणीचे बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ