SSC-HSC Board Exam | विद्यार्थ्यांना दिलासा ! दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जादा अर्धा तास वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Board Exam | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे (SSC-HSC Board Exam) वेळापत्रक जारी केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले. दरम्यान दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 10 वी आणि 12 वीचा तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. म्हणजेच जादा अर्धा तास वाढवून दिला आहे. (SSC-HSC Board Exam)

 

राज्य शासनाच्या नव्या नियमानूसार यंदा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास (Extra Hour) वाढवून मिळणार आहे. कोरोनाच्या महामारीत ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यंदाच्या 10 वी-12 वीच्या लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळणार आहे.

‘शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कोरोना महामारीत ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. परिणामी विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हे लक्षात घेऊन, राज्य मंडळाने यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे 70, 80 आणि 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे. तर 40, 50 आणि 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.’ असं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी सांगितलं.

 

Web Title :- SSC-HSC Board Exam | ssc hsc students will get extra half an hour for examination education Sharad Gosavi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा CM उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले – ‘…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा’

SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक मार्गात 23 डिसेंबरपासून बदल

Esha Gupta Bold-Hot Photos | ईशा गुप्ताच्या डिपनेक गाऊननं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा बोल्ड फोटो

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ