खळबळजनक ! 10 वी च्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) सकाळी नेरुळमध्ये घडला. त्याची प्रकृती ठिक नसल्याने चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे शाळेमध्ये खळबळ उडाली आहे.

सौम्य संजय भटनागर (वय-१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो नेरुळच्या पोदार शाळेत दहावीत शिकत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला होता. त्यावेळी त्याला चक्कर आल्याने तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तात्काळ डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

सौम्य याची प्रकृती ठिक नसताना देखील तो शाळेत आला होता. त्यामुळे त्याला चक्कर आल्याने त्यातच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like