कोविड रुग्णालयाने तपासणी न करता घरी पाठविलेल्या महिलेचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेला कोरोना नसल्याचे सांगत घरी पाठविण्यात आले. त्यांना कोरोना सेंटरमधील डॉक्टरांनी ग्लुकोजची बिस्किटे खा आणि पाणी प्या असा अजब सल्ला दिला. त्यानंतर महिलेा मृत्यू झाल्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.

कुसुंबा येथील एका महिलेस त्रास जाणवू लागल्याने त्यांना 10 सप्टेंबरला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे कोरोनाची तपासणी सकारात्मक आला. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आयटीआय येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात सांगितले.

त्यानंतर आयटीआय डॉक्टरांनी संदर्भ पत्र देवून शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिला रुग्णाच्या तपासणीचे कुठलेही कागदपत्र न पाहता घशाला संसर्ग असल्याचे सांगितले. अशक्तपणा असल्याने ग्लुकोजची बिस्किटे खा आणि पाणी प्या, असा सल्ला देत घरी जाण्यास सांगितले. सोमवारी सकाळी घरी महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी 11 सप्टेंबरला रुग्णालयात जागा नसल्याने रुग्ण दाखल करून घेतला नसेल, असे उत्तर दिले.