विजेचा शॉक बसून पोलिसाच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये राहणा-या एका तरुणीचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. पुजा सुनिल कु-हे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुजा कु-हे हिचे वडील सुनील कु-हे हे आपल्या कुटुंबासमवेत पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या घरावरील पत्रे व भिंतीत विजप्रवाह उतरला होता. आज दुपारी पूजा घरामध्ये असताना तिला विजेचा जोरदार झटका बसला. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषीत केले.

पुजा ही एमबीएचे शिक्षण घेत असून तिच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस वसाहतीमधील घरांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. तिच्या मृत्यूमुळे मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...
You might also like