नदीत बुडालेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पानशेत परिसरातील आंबी नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेली आई पाण्यात पडल्याने तिला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अकस्माक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8182cd22-ca44-11e8-8a6c-9f90f954a630′]

वैष्णवी दत्‍ता भगत (15) आणि कुणाल (17, दोघे रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी या दुर्देवी बहिण-भावांची नावे आहेत. दसर्‍यानिमित्‍त वैष्णवी, कुणाल आणि त्यांची आई सविता (45) हे तिघे पानशेत परिसरातील आंबी नदीत कपडे धुण्यासाठी गेले होते. उत्सवापुर्वी घरातील कपडे, अंथरूणे धुण्याची प्रथा आहे. वैष्णवी, कुणाल, त्यांचा मामेभाऊ आणि आई सविता हे चौघे तेथे रिक्षामधुन गेले होते.

दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सविता या आंबी नदीच्या पाण्यात कपडे धुत होत्या. त्या घसरून पडल्याने त्या बुडाल्या. काठावर असलेल्या कुणाल आणि वैष्णवी यांनी ही घटना बघितली. त्यांनी नदीमध्ये उडी मारली. त्यानंतर त्यांच्या मामेभावाने देखील नदीमध्ये उडी मारली. त्याने तात्काळ वैष्णवी आणि कुणाल यांना बाहेर काढले. आई सविता यांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा वैष्णवी आणि कुणाल यांनी पाण्यात उडी मारली. सविता यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले मात्र कुणाल आणि वैष्णवी पाण्यात बुडाले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8bbe9546-ca44-11e8-a251-0973064f13c9′]

दरम्यान, बहिण-भाऊ पाण्यात बुडाल्याची घटना समजल्यानंतर वेल्हा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वैष्णवी आणि कुणाल यांचे मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी वेल्हा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी आणि कुणाल यांच्या मामेभावाने पोलिसांकडे जबाब दिला असून तो नोंदविण्यात आला आहे. बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.