Corona Virus : चीनमध्ये ‘कोरोना’मुळे 2744 जणांचा मृत्यू तर 78497 जण विळख्यात, इराण दूसरा सर्वाधिक प्रभावित देश

बिजिंग : वृत्त संस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप कमी होताना दिसत आहे. तर या घातक विषाणुने बुधवारी मरणार्‍यांची संख्या 29 होती. ही संख्या मागच्या आठवड्यातील सर्वात कमी आहे. यासोबतच देशात कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची एकुण संख्या 2744 झाली आहे. तर लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 78,497 झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले की, बुधवारी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेली 433 प्रकरणे समोर आली आणि 29 लोकांचा मृत्यू झाला. मरणार्‍यांपैकी 26 लोक विषाणुचे मुख्य केंद्र असलेल्या हुबेई आणि त्याची राजधानी वुहानमधील आहेत.

चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव इराणमध्ये आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसने 26 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी 7 लोकांचा मृत्यू चोवीस तासांच्या आत झाला. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानोश जहानपोर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, या विषाणुने पीडित 106 आणखी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे पीडित लोकांची संख्या वाढून 245 झाली आहे. चीननंतर हा कोरोना व्हायरसने सर्वात प्रभावित देश आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहून पाकिस्तानने गुरूवारी इराणसाठीची सर्व उड्डाणे बंद केली.

सोबतच अधिकारी तेहरानला पोहचलेल्या शेकडो लोकांच्या तपासणीत गुंतले आहेत. पाकिस्तानने संसर्गाच्या भितीने इराणसोबत जमीन आणि रेल्वे संपर्क यापूर्वीच बंद केला आहे. संयुक्त विमान उड्डयण सचिव अब्दुल सत्तार खोखर यांनी सांगितले की, विमान उड्डाण विभागाने पाकिस्तान आणि इराणच्यामध्ये 27- 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील नोटीसपर्यंत सर्व थेट उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरबने कोरोना व्हायरसच्या भितीने इस्लाममधील सर्वात पवित्र तिर्थस्थळ उमरा तीर्थयात्रेसाठी वीजा देणे बंद केले आहे. मक्का आणि मदीना शहरात येणार्‍या लाखो भक्तांना वीजा देणार्‍या सौदी अरबने पर्यटकांना वीजा देणे बंद केले आहे.

सौदी अरबमध्ये विषाणुचा एकसुद्धा प्रकार समोर आलेला नाही, परंतु शेजारी देशांमध्ये याच्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त करून म्हटले की, ही बंदी तात्पुरती आहे. इस्टोनियामध्ये गुरूवारी कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला आहे. हा व्यक्ती इस्टोनियाचा कायम रहिवाशी आहे. परंतु, इराणचा नागरिक आहे आणि एक दिवसापूर्वीच तो इराणवरून परतला होता. सामाजिक न्याय मंत्री टेनेल कीक यांनी म्हटले, ही व्यक्ती बुधवारी सायंकाळी बाल्टिक देशात पोहचला. हा इराणी नागरिक सध्या रूग्णालयात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गुरूवारी म्हटले की, कोरोना व्हायरसचा धोका निर्णायक निर्णायक बिंदूवर आहे. संघटनेने प्रभावित देशांना आवाहन केले की, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरीत कारवाई करावी. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेडरोस घेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये पत्रकारांना सांगितले की, आम्ही निर्णायक वळणावर आलो आहोत. चीनमध्ये विषाणुंची नवी प्रकरणे कमी झाली आहेत. जगाच्या उर्वरित भागात काय होत आहे, ही आता सर्वात चिंतेची बाब आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या धोक्याकडे फारसे लक्ष दिले नाही, तर जगभरात संसर्गात वाढ झाली आहे.

ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, मला वाटते की यामुळे स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. परंतु, काहीही अनिवार्य नाही. त्यांचे वक्तव्य अमेरिकन आरोग्य अधिकार्‍यांच्या आवाहनाच्या विरूद्ध आहे, ज्यांनी अमेरिकन लोकांना सांगितले आहे की, सामुहिकरित्या एकत्र येणे टाळा आणि घरातून काम करा. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसची 60 प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना व्हायरसचा धोका असतानाच व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी कॅथेलिक चर्च लेनटनच्या पहिल्या दिवशी आयोजित अश वेनसडे परंपरेनुसार साजरा केला नाही. तर उत्तर इटलीमध्ये अन्य प्रार्थनासभा रद्द करण्यात आल्या. फ्रान्सिस आणि मोठ्या संख्येने पादरी, बिशप आणि कार्डिनल रोमने एव्हेन्टाइन हिलपासून पाचव्या शतकातील सांता सबीना बैसिलिकापर्यंत भव्य शोभायात्रा काढली. पादरी आणि भक्तांनी मास्क लावले नव्हते. इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 440 पेक्षा जास्त झाली आहे.