कोरोनामुळे अर्थिक ओढाताण असल्याने कर्जमाफी होणार नाही – अजित पवार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – 2 लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, अशी घोषणा मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे त्याची ना अंमलबजावणी झाली ना अध्यादेश निघाला ही केवळ घोषणाच राहीली. मात्र या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवस शिल्लक असताना कोरोनामुळे अर्थिक परिस्थिती ओढाताणीची असल्याने कर्जमाफी होणार नसल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे.

इंदापुर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने उपस्थित होते. पवार यांनी म्हणाले, राज्यशासनाचा अर्थसंकल्प हा साडेचार लाख कोटी असतो, मात्र मार्चपर्यंत साडेतीन लाख कोटी मिळतील. त्यामधील दीड लाख कोटी पगार पेन्शनसाठी जातात. राहिलेल्या रक्कमेतुन सर्व विभागांना न्याय द्यावा लागतो. त्यामुळे अडचणी आहेत असे सांगितले. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. पण उपमुख्यमंत्री पवारांच्या यांच्या विधानामुळे तीही आशा आता मावळली आहे.