Deepak Kesarkar | ‘मुख्यमंत्र्यांनी हिंसा रोखावी, केंद्राने हस्तक्षेप केला तर नंतर बोलू नका’; बंडखोर आमदार दीपक केसरकरांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | शिवसेना बंडखोर आमदारांबाबत सध्या राज्यात जो हिंसाचार सुरू आहे, तो महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थांबवावा, असं आवाहन शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं.

 

त्यावेळी बोलताना दिपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “शिवसेनेत या आधीही गट पडलेले आहेत. भाजपातूनही (BJP) अनेक जण बाहेर पडले आहेत, मात्र त्यावेळी कुणी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केलेली नव्हती. कार्यालयावंर, घरांवर हल्ले केले गेले नव्हते. हे असे राजकारणात घडणार, ते स्पोर्टिंगली घ्यायला शिका,” असं आवाहन बंडखोर आमदारांनी शिवसेनेला केले आहे. उद्या जर परिस्थितीत चिघळली आणि केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करत काही उपाय योजले तर नंतर बोलू नका,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.

पुढे दिपक केसरकर म्हणाले, “राज्यात सध्या जी परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारे हल्ले होताहेत, ते आपण सगळेजण पाहत आहोत, अशा स्थितीत महाराष्ट्रात येणे हे सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी दुसऱ्या पक्षात आमदार काही गेले नाहीत का, त्यावेळी कुणी रस्त्यावर उतरले नाही. हे राजकारणात होतच असते, अशा वेळी हल्ले होणे बरोबर नाही. राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत, त्यांनी आवाहन केले तर हे सगळे थांबू शकेल.”

 

दरम्यान, “दोन तृतियांश गट जर शिवसेनेतून फुटला असेल तर आमच्या गटाला लगेच मान्यता द्यायला हवी.
त्यात अडचणी निर्माण होत आहेत. खरेतर हा अधिकार आम्हाला लगेच द्यायला हवा होता.
नाहीतर कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागतील. तर, गट निर्माण झाल्यावर पुढे कुणासोबत जायचे हे ठरवता येईल,”
असं देखील केसरकर म्हणाले. तसेच ‘या बंडामागे भाजपा नसल्याचे’ केसरकरांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | cm should stop violence rebel mlas appeal if center intervenes dont speak later kesarkar warns

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा