Deepak Kesarkar On Uddhav Thackeray | ‘शिवसेनेचे अनेक खासदार नाराज ! उद्धव ठाकरे यांनी एनडीएसोबत यावं’ – दीपक केसरकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Deepak Kesarkar On Uddhav Thackeray | आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एनडीएसोबत (NDA) येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज असल्याचेही केसरकर यांनी म्हटलं आहे.

 

दीपक केसरकर हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहेत. त्यावेळी केसरकर म्हणाले की, “आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत. तसेच, उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की एनडीएमध्ये यावे. 80 टक्के खासदार नाराज आहेत. खासदार हिंदुत्वाचा मार्ग सोडणार नाहीत. शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत आले पाहिजे.”

 

पुढे केसरकर म्हणाले, “राऊत हे शरीराने शिवसेनेत पण मनाने राष्ट्रवादीत आहेत.
पवारसाहेब म्हणतात दोन पण आमदार निवडून येणार नाही.
पण त्यांनी भूतकाळात रमून चालणार नाही,” असं त्यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, “आम्ही एका विचाराने पुढे जात आहोत.
हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- shivsena chief uddhav thackeray should come with nda 80 percent shiv sena mps are angry say deepak kesarkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा